पवनार येथे उभारणार बजतगटाची बाजारपेठ! महिलांना मिळणार आर्थीक बळ

सतीश खेलकर

पवनार : ग्रामिण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून उद्योग निर्माण करुन कुटूंबातील उत्पन्नात भर घालत जास्तीत जास्त उत्पन्न निर्माण करून आपल्या कुटुंबाला हातभार लावता यावा याकरीता पवनार येथील महिलांनी बजतगटाच्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण केली आहे. याकरीता महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून घरी स्वतः उत्पादीत केलेल्या वस्तू तयार करुन त्याला चांगली बाजारपेठ मिळण्याकरीता पवनार येथे महिलांसाठी बचतगटाच्या माध्यमातून मॉलची स्थापना करण्यात आली.

या मॉलमध्ये शहरातील मॉलप्रमाणे एकाच छताखाली महिलांच्या २० समुहाने तयार केलेले पापड, साबण, हळद, दुध, दही, वड्या, शेवळ्या, कपडे, सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, तिखट, शेवळ्या, ज्वेलरी इत्यादी उत्पादन विक्रीसाठी ठेवल्या जानार आहे. गावातील वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातुन तयार केलेला माल विक्रीस उपलबद्ध केल्या जाणार असल्याने या ठिकाणी विकल्या जानार्या सर्व वस्तू घरीच तयार केल्याने त्या दर्जेदार व भेसळमुक्त राहणार आहे परिणामी या वस्तूंना भविष्यात मोठी मागणी राहणार आहे.

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान क्षितिज प्रभाग संघ नलवाडी अंतर्गत या बाजारपेठेची संकल्पणा मांडण्यात आली. पवनार येथील महिला बचत गटाच्या महिलांनी मिळून या परमधाम महिला उत्पादक केंद्राची निर्मीती केली आहे. यामध्ये नालवाडी विभागाच्या २६० समूह व २८८६ कुटुंब सहभागी आहेत. या माध्यमातुन महिलांना आर्थीक दृष्या सक्षम करण्याचा त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना आर्थीक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

महिला बचतगटाच्या या मॉलचे काही दिवसापुर्वी थाटात उद्घाटण करण्यात आले यावेळी त्याचे उदघाटन कऱण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद, प्रकल्प जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष वर्धा टीम, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटींग) मनीष कावडे, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष वर्धा टीम, तालुका अभियान व्यवस्थापक रजनी शिरभये, तालुका समन्वयक रितेश जभुळकर, तालुका समन्वयक सोनाली डोंगरे प्रभाग समन्वयक सोनल नीमजे, सर्व उध्योग सखी, बैंकमित्र कृषीसखी व सर्व संघच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


प्रतिक्रीया…

बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या या बाजारपेठेत महिलांनी स्वताहा घरी हाताने तयार केलेला माल असल्याने येथे विक्रीस आलेल्या सर्व वस्तू दर्जेदार आणि बाजारातील मशीच्या सहायाने बनविलेल्या ईतर वस्तूंच्या तुलनेत खान्यास व आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याने येथील मालाला मोठ्या प्रमाणात मागणी राहील यात शंका नाही.
अश्विनी कवाडे, अध्यक्ष क्षितीज प्रभाग संघ नालवाडी

बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या मालास या बाजारपेठेच्या माध्यमातून मागणी वाढणार असुन यातुन महिलांच्या उत्पन्नात मोठी भर पडनार आहे. यातुन महिलांच्या कुटूंबाला हातभार लागनार असल्याले महिला सक्षमीकरनाकडे हे पाऊल पडत असल्याचे चित्र या निमित्याने पवनारात पाहायला मिळनार आहे.
शकुंतला नगराळे, ग्रामपंचायत सदस्य पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here