धक्कादायक! रक्तपेढीतील रक्तातून चिमुकलीला HIV ची बाधा

मूर्तिजापूर (जि. अकोला) : जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये HIV बाधित रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांच्या चिमुकलीला HIV ची बाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार महिन्याभरापूर्वीच घडला असून बुधवारी संबंधित चिमुकलीच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूरच्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे अकोल्याच्या बी.पी.ठाकरे रक्तपेढीतून मागविण्यात आले. त्यानंतर ते रक्त तिला चढविण्यात आले. त्यानंतरही तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिला अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी तिचा एचआयव्ही अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या आई-वडिलांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे एचआयव्ही बाधिताचे रक्त देण्यात आल्यामुळे ही चिमुकली बाधित झाल्याची शंका बळावली.

दरम्यान, सदर चिमुकलीच्या पालकांनी बुधवारी जिल्हाधिकारी नीमा आरोरा यांना यासंदर्भात तक्रार दिल्याचे समजते. याबाबत अवघाते रुग्णालयाच्या डॉक्टरांना विचारले असता, ते म्हणाले, ”बालिकेच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्याने तिला रक्त देणे गरजेचे होते. परंतु, आमच्याकडे अधिकृत रक्तपेढीतून आलेले रक्त संपूर्ण तपासणी केलेले असते. नातेवाईकांनी आणलेले रक्त आम्ही दिले. ते रक्त पॉझिटिव्ह असल्याचे आम्हाला माहिती नव्हते.”

रक्तदात्यांकडून रक्त घेतल्यानंतर त्या रक्ताच्या किमान पाच तपासण्या केल्या जातात. या बाळाला ज्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले तेव्हा तो निगेटिव्ह होता. ‘विंडों पिरियड’ दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे रक्तपेढीकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here