वर्ध्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार! नंदोरी जवळील घटना

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर चंद्रपूर महामार्गांवरील नंदोरी जवळील मेंढूला फाट्याजवळील काही अंतरावर मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, वनक्षेत्र अधिकारी विजय धात्रक यांना माहिती दिली. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनेचा पंचनामा केला. सदर मादी जातीचे बिबट अंदाजे 3 वर्षाचे असावे असे वनविभागकडून सांगण्यात आले.

अपघातस्थळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबटच्या डोक्याला जबर जखमी झाल्याने जागेवरच बिबट्याच्या मृत्यू झाला, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर व विजय धात्रक यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता आजदा रोपवाटिकेत आणण्यात आले. यावेळी पशु संवर्धन अधिकारी डॉ स्मिता मुडे, वनरक्षक योगेश पाटील, प्रशांत कोल्हे क्षेत्र सहाययक कोरा, बिटरक्षक सुरेखा तिजारे, वनरक्षक सोपान कामतवर, अनिल जुमडे, अशोक दांडेकर, ए व्ही कोटे, दिलीप देशमुख वनकर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here