अत्यावतयक सेवेची पाच दिवस तर इतर दुकाने राहणार तीन दिवस सुरू! जिल्हाधिकार्‍यांनी निर्गमित केला आदेश

वर्धा : महाराष्ट्रातील कोविड रूग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिलेत. त्यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शहर व ग्रामीण भागासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यानूसार अत्यावश्‍यक सेवेची दुकाने पाच दिवस तर इतर दुकाने आठवड्याचे तीन दिवस सुरू राहणार आहे.

वर्धा नगर पालिका तसेच लगतच्या ११ ग्रामपंचायती, पुलगाव व लगतच्या दोन ग्रामपंचायती, हिंगणघाट नगर पालिका व लगतच्या चार ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत सुरू राहणार आहे. तर इतर सर्व सेवा दुकाने सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवस सकाळी ७ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यातील उर्वरीत भागात सर्व अत्यावश्‍यक व इतर सेवा वस्तू दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र स्वतंत्र, एकल दुकान, मॉल्स व शॉपींग सेंटर यांना निर्बंध शिथिल राहणार नाही. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरॅट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच व पार्सल सेवा सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

या कालावधित राहनार निर्बंध कडक

वेंद्कीय सेवा व इतर आणिबाणीची परिस्थिती वगळता सोमवार ते शुक्रवार दुपारी २ याजल्यानंतर तसेच शनिवार, रविवार सर्व प्रकारच्या हालचाली, येण्याजाण्यावर निर्बंध कायम असतील. रस्त्यावर खाद् पदार्थाची विक्री करता येणार नाही.

न.प.क्षेत्रातही जागा ठरवून दिल्या जाणार

नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी फेरीवाले, भाजीविक्रेते, फळ विक्रेते यांना ठरवून दिलेल्या जागेवरच व फिरून व्यवसाय करता येईल.

बॅंका, शासकीय कार्यालये पर्ण क्षमतेने

कोरोना विषयक काम करणार्‍या आस्थापना, कृषी, बँक, मान्सून पुर्व कामाची यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन व कार्यालवे पुर्ण क्षमतेने सुरु राहतील, शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहील. ग्राभीण व शहरी भागातील सर्व पेट्रोलपंप सकाळी ७ ते १ पर्यंत सुरू राहतील. प्रशासनाच्या तियपांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्ती किंवा संस्थेवर कठोर कारवाई होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here