कारच्या काचा फोडून रोकड ल॑पास

देवळी : ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबलेल्या कंत्राटदाराच्या कारच्या काचा फोडून रोकड भरलेली बॅग अज्ञाताने चोरून नेली. कापसे पेट्रोल पंपासमोरील ढाब्यावर ही घटना दुपारच्या सुमारास घडली. कंत्राटदार रामभाऊ गंगाधर झोरे हे एम,एच.3२ ए.एच,०३२० क्रमांकाच्या कारने नवरखेडे यांच्या ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी रोकड भरून असलेली बॅग गाडीतच ठेवली. चोरट्याने कारच्या काचा फोडून पैसे असलेली बॅग चोरून नेली. बॅगमध्ये एक लाख ६ हजार रूपये होते. या प्रकरणी देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here