खाजगी बस दरीत कोसळली! 5 गंभीर, 23 किरकोळ जखमी; देवळी पेंढारीच्या घाटातील घटना

सेलू : खाजगी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना तालुक्‍याच्या सिमेलगत असलेल्या देवळी-पेंढरीच्या घाटातील वळणावर शुक्रवार 16 सप्टेंबर रोजी घडली. सदर अपघातात पाच प्रवासी गंभीर असून, 23 प्रवाशी किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमीवर नागपुरातील लत्ता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून एम. एच. 40 एटी 0219 क्रमांकाची खाजगी बस जवळपास 30 प्रवाशांना घेऊन सेलू तालुक्यातील बोरधरणला जात होती. दरम्यान, देवळी- पेंढरी नजिकच्या घाटातील वळणावर बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस लगतच्या 20 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 23 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here