शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम! बोरगाव (मेघे) येथे जनजागृती बैठक संपन्न

वर्धा : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्या नियोजनात तर जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांचे नेतृत्वात जिल्ह्यात शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येत असून बोरगाव (मेघे) येथे शिवसेना शाखेची जनजागृती बैठक दि.१५ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.

या कार्यक्रमाच्ये अध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिल देवतारे होते तर प्रमुख उपस्थिती महिला आघाडी जिल्हा संघटिका वंदना भूते, तालुका प्रमुख गणेश इखार, जिल्हा विधी व कायदेविषयक सल्लागार ऑड उज्ज्वल काशीकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोंगाडे,शाखा प्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य युनूस खान पठाण,उपतालुका प्रमुख प्रवीण वरमकार उपशहर प्रमुख अनिकेत जगताप मंचावर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यांचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करत आहे त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, शासकीय योजनांचे लाभ मिळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी. असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी शिवसैनिकांना संबोधित करतांना केले.

या प्रसंगी बोरगाव (मेघे) येथिल भूषण बावनकर, गजानन झाडे, सुरेश भुरे, अभिषेक जावळेक, राजू वैद्य, गजानन सफकाळ, मनोज मोहरकर, जयवंत गवाळे, राजेंद्र शेजोळकर, नितीन वाडेकर, सचिन निखाते, प्रफुल्ल बनसोड, शंकर गोल्हर,आकाश भुरे, सचिन पानसे व इत्यादी युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.तसेच जेष्ठ शिवसैनिक प्रवीण जौजारे, राजेंद्र गव्हाळे, सुनील चंदनखेडे, पंकज कोल्हे, प्रशांत होलगरे, मनोज घारपांडे, सुनील महाजन, पिंटू सहारे, नितिन भुरे, प्रशांत झाडे व इत्यादी शिवसैनिकांनी नव्या जोमाने शिवसेनेचे कार्य घराघरात पोहचवण्याचा निर्धार बैठकीत जाहीर केला.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रताप शेंडे, प्रविण राठी, रोशन नागतोडे, रोहित गोडे, सूरज मोहर्ले, शेखर बावणे, प्रफुल्ल बनसोड, राजु मोहर्ले, मंगेश बनसोड, भूषण राठी, भूषण मेश्राम, लकी वाकेकर, दिनेश डोबवाल, अभिषेक पोहले, शशिकांत ठाकरे, मुकेशभाऊ नरपांडे, प्रवीण गिरडकर, मोनू तम्बीया, चिकु सायकार, नितीन वाडेकर, मनोज देशमुख, अक्षय चौव्हान ,राजु भुरे, महादेव पंचभाई, प्रशांत होलगरे व इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here