कारसह पावणेसहा लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

वर्धा : शहरात विदेशी दारू येत असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून कारसह ५ लाख ९५ हजार ४५० रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली. योगेश अनिल निनावे, रा. सोमनाथे ले-आउट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

रामनगर हहीत दारू येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली असता एम.एच. ३१ सी.आर, ४४०० क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी कारसह दारूसाठा जप्त करीत आरोपीला अटक केली. तसेच त्याने हा दारूसाठा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बारमधून आणल्याची माहिती दिली असता पोलिसांनी बार मालक मुकेश जयस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. याप्रकरणी रामनगर पोलिस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, गजानन लामसे, राजेश जयसिंगपुरे, गोपाल बावणकर, गजानन दरणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here