रेतीघाटावरून अवैध उत्खनन! तीन ट्रेझर बोट, तीन जेसीबी जप्त

आर्णी : तालुक्यातील कवठाबाजार रेतीघाटावर प्रशासनाने संयुक्‍त कारवाई करीत धाड मारली. यावेळी ट्रेझर बोटी व जेसीबीद्वारे अवैध उत्खनन होत असल्याचे प्रशासनाला आढळून आले. त्यावरून 3 टेझर बोटे 3 जेसीबी जप्त करण्यात आली. ही कारवाई 29 मार्चला पहाटे 6 वाजताच्या सुमारास करण्यात आली. मागिल काही दिवसापूर्वी आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथे लिलाव झालेल्या रेतीघाटावर अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रसिध्द झाले होते. त्यापु्वीही रेतीघाटावरून नियमावलीला बगल देउन दिवसरात्र रेतीचा खुलेआम उपसा केला जात होता.

दरम्यान शेती स्वलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सदर रेतीघाटावर जावुन प्रत्यक्ष पाहणी करुन आर्णी तहसीलदार यांना अवैध रेतीचे घाटावरून उत्खनन होत असल्याचे सांगून खडेबोल सुनावले. त्यांनंतर थोड्या दिवसात जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या पथकाने नदीपात्रात कार्यवाही केली होती. दरम्यान आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास दारव्हा येथिल उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेळकर व तहसीलदार परसराम भोसले यांच्या संयुक्‍त पथकाने कवठा बाजार रेतीघाटावर आकस्मिक रित्या धाड मारली.

तेव्हा कबठा बाजार येथील लिलाव झालेल्या रेती घाटात नदीपात्रात एक ट्रेझर बोट व एक जेसीबी मशिन 4 रिकामे टिप्पर व 17 लेबर आढळुन आले. व तसेच त्याच ठिकाणी नदी पात्रात माहुर हद्दीत दोन ट्रेझर बोट व दोन जेसीबी मशिन देखिल आढळुन आल्यात. सदर सर्व वाहनाचा पंचनामा करण्यात करण्यात आला असून सदर ट्रेझर बोट व जेसीबी मशिन राजेश मारोतराव अडकिने रा. बरोडी ता.महागाव यांना सुपुर्द नाम्यावर देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here