घर फोडून 1 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास! हिंगणघाट तालुक्‍यातील दारोडा येथील घटना

वर्धा : घराच्या मागील टिना व तटवे तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील चांदीच्या दागिन्यासह रोख 55 हजार असा 1 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी ल॑पास केला. ही घटना हिंगणगाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे 27 मार्च रोजी रात्रीच्यादरम्यान घडली. चोरट्यांनी चांदीचे पैंजन, सोन्याची बाळी. सोन्याचे लॉकेट. सोन्याची पत्ती व सोन्याचे डोरले, चांदीचे कडे, सोन्याचे 30 मनी असा 60 हजार रुपयांचा तर नगदी 55 हजार रुपये चोरून नेले आहेत. या प्रकरणी रणविरसिंग बहादुरसिंग फादा रा. दारोडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध हिंगणगाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here