

सिंदी रेल्वे : इंग्रजकालीन वारसा लाभलेल्या ऐतिहासिक विदर्भ प्रसिध्द तान्हा पोळ्याची आज विकायला आलेल्या नंदीबैलानी चाहुल लावली असुन संपुर्ण सिंदी नगरी दोन वर्षानंतर साजरा होणाऱ्या पोळा महोत्सवाच्या जोमाने तयारीला लागल्याचे चित्र शहरात सर्वत्र नजरेस पडत आहे.
मागील २० वर्षांपासून शहरात आपल्या कलाकुसरीतुन आकाराला आनलेले देखने नंदी बैल घेऊन हिंगणघाट येथील काष्ठशिल्पकार विनोद राखुंडे यांनी शहरातील झेंडा चौकात गुरुवारी विक्रीस उपलब्ध केल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि सलग दोन वर्षांच्या खंडीत कोरोणा काळानंतर पहिल्यादा साजरा होणाऱ्या विदर्भ विख्यात शहरातील तान्हा पोळ्याची चाहुल लागली. तसे संपुर्ण शहर आपल्या शहराचे भुषन असणार्या नंदी पोळ्याच्या तयारी मग्न असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते आहे.
कारागीर राखुंडे सांगतात की नंदी बैलाच्या कलाकुसरीची खरी किमंत होती ती आपल्या पोला सिटी सिंदी रेल्वे मध्ये… येथे माझ्या बैलाना ग्राहकांची पसंती मिळते आणि सुयोग्य किमंत सुध्दा मिळते शिवाय मोठ्या प्रमाणात येथे नंदीबैलांची विक्री होते. आमच्याकडे १५०० रुपयांपासून १५००० रुपये किमंतीचे नंदी बैल आहेत. दोन दिवसाचा उत्सव वर्षभराचा जगण्याच बळ देऊन जाते