कारसह 5.80 लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त! वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारूची वाहतूक करतांना कारसह 5 लाख 80 हजार 200 रूपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कामगिरी वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बुधवारी पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपी सतीश गणपत हजारे (33) रा. गणेशपेठ, नागपूर, ललित अंकुश नारनवरे (38), रा. रामनगर, वर्धा, या दोन आरोपींना दत्तपूर शिवारातून अटक केली आहे. तर नयन चिंतलवार रा. नागपूर हा आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांनी आरोपीकडून ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशीदारूने भरलेल्या प्रत्येकी 180 एमएल्च्या शिशांचे 5 खोक्यांमधील 264 सिलबंद बाटल्या, ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 180 एमएळलच्या शिशांचे 5 खोक्यांमधील एकूण 252 सिलबंद बाटल्या रॉयळ स्टॅग कंपनीच्या बिदेशी दारूने भरलेल्याप्रत्येकी 180 एमएलच्या शिशांचे दोन खोक्यांमधील 72 सिलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज प्रत्येकी 480 एमएलच्या 24 सिलबंद बाटल्या, रॉयल स्टॅगच्या प्रत्येकी 750 एमएलचे तीन बम्पर, टॅगो पंच कंपनीच्या प्रत्येकी 90 एमएलच्या 100 सिलबंद बाटल्या, बियरच्या प्रत्येकी 650 एमएलच्या 24 बाटल्या, व 500 एमएल 24 टिनाचे डब्बे व एक जुनी बापरती कार क्र. एम. एच. 31 ईए 4483, एक अँड्रॉईड मोबाइल संच सिमसह असा एकूण 5 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, अभिजित वाघमारे, राजेश जयसिंगपूरे, अमोल ढोबाळे, प्रदीप बाघ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here