अपघातात दोन ठार, दोन गंभीर! हिंगणघाट – अलमाडोह येथील घटना

वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले, एक अपघात अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलमाडोहजवळ झाला, तर दुसरा अपघात हिंगणघाटच्या नंदोरी रस्त्यावरील साई लॉनजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील संत तुकडोजीनगर येथील रविकांत गणेश पुंड (42) यांचे नंदोरी मार्गावर सलूनचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे दुकानात पोहोचले. सायंकाळी एमएच 32 एम 1053 क्रमांकाची दुचाकी जात होती. उजव्या बाजूने, त्याचवेळी भरधाव वेगाने जाणारी मालवाहू वाहने तेथून पुढे गेल्याने दुचाकीचा अपघात झाला. त्यात दिलीप आंबरबाले गंभीर जखमी झाले, असे पुंड यांनी सांगितले. नागरिकांच्या मदतीने जखमीला शासकीय रुग्णालयात व नंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात प्रथम उपचारासाठी पाठविण्या आले. उपचारादरम्यान दिलीप आंबरवाले यांचा उपचार दरम्यान मूत्यू झाला. याप्रकरणी रविकांत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here