महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले! १३ हजार ४०० रुपयांचे नुकसान

आर्वी : तालुक्‍यातील वैशाली परतेकी या वर्धमनेरीला जाण्याकरिता गुरुवारी दुपारी मांडला चौरस्त्यावर उभ्या होत्या. यादरायान आर्वीकडून काळ्या रंगाच्या दुचाकीने आलेल्या दोघांनी त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यांना वा अज्ञात युवकांबद्दल शंका आल्याने त्या गावाकडे येण्याकरिता वळल्या. तेवढ्यात युवकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्राला हिसका मारुन पळ काढला. साडेचार ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याने त्यांचे १३ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी आर्वी पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here