मालमत्ता कर कमी करण्यासाठी बोरगाव ग्रा.पं. वर धडक

वर्धा : शहरालगतच्या बोरगाव (मेघे) ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा ठराव मासिक सभेत सर्वानुमते पारित करण्यात आला. मात्र, हा ठराव चुकीचा असून नागरिकांना जीवघेणा ठरणारा असून मालमत्ता कर कमी करण्यासाठी नागरिक बोरगाव ग्रामपंचायतीत धडकले.

यावेळी हा ठराव रद्द करण्याची मागणी रेटून धरत निवेदनही देण्यात आले. कोरोना काळात अनेकांच्या हातची कामे गेली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे मध्यम वर्ग, शेतमजूर, नोकरवर्ग, व वाढीव कराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यासाठी मोर्चा नेला.

यावेळी ग्रा.पं. सदस्य साधना वासनिक, प्रताप शेंडे, देवानंद दखणे, शारदा तडस यांनी हा ठराव चुकीचा होता असे मान्य करून पुढील सभेत हा ठराव रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रोर्चांत मंगेश भोंगाडे, गजू झाडे, सुनील चंदनखेडे, सुरेश भुरे, संजय होलगरे, प्रवीण जैजारे, गजानन तडस, ज्ञानेश्वर मारबते, संगीता जढाळकर, सुनंदा तिघरे, मंगला मोह्ले, प्रेमिला बोरघरे, कांचन मांडवकर, सुनिता लोणकर, ज्योती चुटे आदी होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here