हॉटेलात सुरू असलेली दारूविक्री पोलिसांनी उधळली

वर्धा : कारला चौकात बायपास जवळील हॉटेलातून दारूविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारला चौकाती बायपासलगत असलेल्या एस.एम. बिर्याणी हॉटेलात छापा मारून प्लास्टिक खुर्च्यांसह टेबल आणि दारूसाठा असा एकूण ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने १९ रोजी रात्री केली. नरेश दिलीप मुरकुटे (33, रा. सावजीनगर), अजय राजू खेतावत (२८, रा. सावजीनगर), सधीर सहारे (रा. वरुड, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कारला चौकापुढील बायपास रस्त्यालगत असलेल्या एस.एम. बिर्याणी हॉटेलात दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. १९ रोजी विशेष पथकातील पोलिसांनी हॉटेलात छापा मारला असता विदेशी दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी लाकडी टेबल, पाच लोखंडी टेबल, खुर्ची, १५ पाण्याचे कॅन्स, कुलर, ग्लास, मोबाइल आणि १६३० रुपये रोख असा एकूण ५४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here