

सेलू : तालुक्यातील डोंगरगाव प्रकल्प परिसरात मित्रासह फिरायला गेलेल्या अंतरगाव येथील अमोल पाने वय २७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली.
सेलूतील बाजार पेठ बंद असल्याने काही तरूण आपल्या सहकारी मित्रासह डोंगरगाव प्रकल्प येथे गेले तिथे मदीरा प्राशन केल्याचे कळते यात काहीनी आंघोळ करण्याकरीता पाण्यात उडी घेतली यातील मृतक तरुण अमोल हा खालचे बाजूला असलेल्या खोल टाक्यात गेला तिथे त्याचा बुडून मृत्यू झाला.
हा तरुण दिसेनासा झाल्याने ईतरांची तारांबळ उडाली त्याचा शोध घेतला असता तो बुडून मृत्यू पावल्याचे निदर्शनास येताच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास ठाणेदार सुनील गाढे करीत आहे.