हार्वेस्टर कोसळले विहिरीत

नेर : तालुक्‍यातील चिकणी डोमगा येथील शेतकरी विलास शेडके यांच्या शेतात गव्हाची काढणी सुरू होती. विहिरीजवळ हार्वेस्टर वळविताना अचानक ते विहिरीत कोसळले. हा विचित्र अपघात बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विहिरीतून हे अवजड हार्वेस्टर बाहेर कसे काढायचे, असा प्रश्‍न पडला आहे. त्यासाठी लागणारी मोठी क्रेन शेतात आणण्याकरिता कसरत करावी लागणार आहे. यात कुणीही जखमी झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here