

आंजी : दरवर्षी होणारी ढगा भुवनातील महाशिवरात्रीची यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी रद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू आहे. यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समिती ढगा व मासोद यांनी सभा घेऊन ११ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी भाविकांना दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.