डिझेल चोरणाऱ्या दोन चोरांना ठोकल्या बेड्या! ५० हजाराचे डिझेल चोरट्यांकडून जप्त

वर्धा : येळाकेळी येथील समृद्धीच्या कामावर असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी डिझेल चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास सावंगी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक करीत असताना पथकाने चोरीतील दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ४० हजार किमतीचे डिझेल जप्त केले. सुनील नारायण सहारे, रा. खापरखेडा यांच्या मालकीचा ‘एम.एच.४० बी.एल. ७३७६ क्रमांकाचा ट्रक येळाकेळी येथे सुरू असलेल्या समृद्धीच्या कामावर होता. त्यांच्या ट्रकमधून चोरट्यांनी ५५ लीटर डिझेल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी सावंगी पोलिसात दिली होती.

गुन्हे शोध पथकाने तपासचक्र फिरवून आरोपी गणेश नारायण सोमनकर, हरीष विठ्ठल पिंपळे दोन्ही रा. येळाकेळी यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीचे डिझेल जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बाबासाहेब थोरात, रामदास बिसने, प्रदीप राऊत, अमोल भिवापुरे, सूरज जाधव यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here