डुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू! १० जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा : रस्त्याने जात असताना डुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या विचित्र अपघातात चिमुकल्यासह अन्य एक ठार झाला. हा अपघात शनिवारी (ता. १२) रात्री ११ वाजताच्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गवर झाला.

कार यवतमाळ कडून येत होती. त्या कारला डुकरांचा कळप आडवा गेल्याने चालकाने तातडीने ब्रेक मारला. यात एक डुकराला धडक बसली. याच दरम्यान जात असलेल्या दुचाकी चालकाने अपघातग्रस्तांना मदत करण्याकरिता रस्त्यावर दुचाकी थांबविताच दुसऱ्या भरधाव कारणे त्याला आणि उभ्या असलेल्या कारला धडक दिली. यात दुचाकी चालकासह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here