हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी अक्षय थुटे यांची नियुक्ती! जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

हिंगणघाट : वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद च्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी अक्षय थुटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री नीरजदादा बुटे यांच्या प्रमुख उपस्तिथीत अक्षय थुटे यांना नियुक्ती पत्र व मराठा सेवा संघाचे दिनदर्शिका देऊन नियुक्ती करण्यात आली.

संघटनेशी असलेली प्रामाणिकता आणि याआधी कुठलेही पद नसताना संघटन वाढी साठी केलेले प्रामाणिक प्रयत्न लक्षात घेता त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्यावर हिंगणघाट विधानसभेची जबाबदारी देण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर बेलगे, धीरज चव्हाण, दुशान्त ठाकरे, अक्षय इंगोले, दीपक नवघरे आदी पदाधिकारी उपस्तित होते. नियुक्ती बद्दल हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यासह वर्धा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here