बेकायदा तिकीटविक्री करणारा गजाआड! २ हजार ३७३ रुपयांची तिकिटे जप्त

वर्धा : सेलू येथील एका दुकानातून बेकायदा रेल्वेच्या आरक्षित ई-तिकीट आणि आरक्षित तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती सेवाग्राम येथील रेल्वे सुरक्षा बळाच्या पोलिसांना मिळाली. रेल्वे पोलिसांनी सेलू येथील इन्फोटेक ऑनलाइन शॉपमध्ये छापा मारून आरोपी मयूर पद्मावत चोरे (२८) याला तिकिटांचा काळाबाजार करताना अटक केली.

सेलू येथील इन्फोटेक ऑनलाइन या दुकानातून रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती सेवाग्राम येथील रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सेलू येथे जात इन्फोटेक ऑनलाइन दुकानात छापा मारला असता मयूर चोरे हा अनधिकृतरीत्या कुठलीही कायदेशीर परवानगी नसताना ई तिकिटांची विक्री करताना मिळून आला. तो प्रवाशांकडून जादा रक्‍कम घेऊन कमिशन घेत आरक्षित तिकिटांची स्वत:च्या युजर आवडीवर तयार करत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून १ ई तिकीट आणि दोन आरक्षित तिकीट असा २ हजार ३७३ रुपयांची तिकिटे जप्त करीत अटक करण्यात आली. तसेच दुकानातील संगणक आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here