शेतकर्‍यांनी आधारभूत किंमत योजनेखाली कापसाची नोंदणी करावी! बाजार समितीत नोंदणी प्रक्रीया सुरु

सेलू : तालुक्यातील शेतकर्‍यांनी आधारभूत किंमतीमध्ये केलेली वाढ लक्षात घेता सीसीआयला आधारभूत किंमत योजनेखाली कापसाची खरेदी करावी लागणार आहे. याकरिता बाजार समिती कार्यालयात (ता.१५) पासून नोंदणी सुरु होत असल्याची माहिती सभापती विद्याधर वानखेडे यांनी दिली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे कापूस हंगाम सुरु होण्यापूर्वी म्हणजे आँक्टोबर २०२० पूर्वी कापसाची नोंदणी करण्याबाबत शासनाकडून सुचीत करण्यात आले आहे. आधारभूत किंमतीमध्ये कापसाची खरेदी मार्केट यार्ड मध्ये केली जाणार आहे. कापूस विक्रीचे नोंदणी करीता सुरु वर्षातील कापूस पिक पेर्यासह सातबारा, आधार कार्ड कोडसह बँक पासबुकची झेराँक्स व मोबाईल क्रमांक ईत्यादी कागदपत्र नोंदणी करतेवेळी आवश्यक आहे. आधारभूत किंमतीमध्ये कापसाची खरेदी १५ सप्टेंबर पासून सुरु होत असून ३१ आँक्टोबर पर्यंत सुटीचे दिवस वगळून सुरु राहील शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here