वर्धा : जिल्ह्यातील SC-ST समाजातील नवीन उद्योजकाकरिता व व्यवसायाकरिता मुद्रा लोनव इतर लोण माध्यमातून तातडीने ज्यादा दस्ताऐवजची मागणी न करता कर्ज देऊन व ज्या लोन केसेस बँकेमध्ये प्रस्तावित आहे त्या तत्काळ निकाली काढण्याचे आदेश वर्धा जिल्यातील बँकांना देण्यात यावे यासाठी भिम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार याना निवेदन देण्यात आले.
आज संपूर्ण देश कोरोनाच्या रोगामध्ये अडकलेला असून अनेक लोकांना आपला रोजगार गमवावा लागलेला आहे.त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील SC-ST समाजातील शिक्षित व होतकरू युवक नवीन व्यवसाय करू इच्छितो परंतु त्यांच्याकडे भांडवल नसल्याने ते बँकेकडे कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करतात, परंतु जिल्ह्यातील अनेक बँका कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. अनेक लोन प्रकरणे अध्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अनेक नवीन उद्योजक क्षमता असून सुद्धा बेरोजगार आहे.
तरी आपणास सदर निवेदनाद्वारे विनंती आहे कि,वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रीयकृत बँका तसेच खासगी बँकांना SC-ST प्रवर्गातील निवीन उद्योजकांना तथा ज्यांनी कर्जाकरिता अर्ज केलेला आहे त्यांना लवकरात लवकर मुद्रा लोन तथा अन्य योजनांच्या माध्यमातून दाखल केलेले कर्ज प्रकरणे निकाली काढायचे आदेश द्यावे SC-ST समाजातील होतकरू नवीन व्यावासाहीकांना, उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करावी असे निवेदन भिम आर्मी चे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के, जिल्हा महासचिव राज मून, समीर मलधाम, प्रशिल पाणबुडे, दीक्षित सोनटक्के, बंटी रंगारी,आकाश पाझारे यांच्यासह भिम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.