

वर्धा : मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित हानी झालेली आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करने काळाची गरज आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन करनेही तितकेच गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल नीट राहण्यात वृक्ष महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक मेघल अनासाने यांनी केले. तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतिने नागटेकडी परिसरात आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, भिम टायगर सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विशाल नगराळे, इतिहास अभ्यासक प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, यूवा उद्योजक वैभव उमाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बेसूमार वृक्षतोड झाल्यामुळे जंगलांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. परिणामी वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. यातून मानव आणि वन्यजीवांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष टाळण्याकरीता फळझाडांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतिने वृक्षलागवडीच्या माध्यमातून हाती घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष राहुल खोब्रागडे यांनी यावेळी सांगीतले.
भविष्यात वन्यजीवांना त्यांचा अधिवास आणि खान्याकरीता अन्न मिळावे याकरीता संस्थेच्या वतिने पवनार येथील नागटेकडी परिसरात आंबा, चीकू, जांभूळ, लिंब, मोसंबी, संत्रा, करवंत, सीताफळ, आवळा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वतिने झाडांच्या सुरक्षीततेसाठी ट्रिगार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच टेकडीवर दररोज झाडाला पाणी देण्याचीही जबाबदारी संस्थेने घेतली आहे. या उपक्रमात परिसरातील वृक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.
कृषि पर्यवेक्षक प्रशांत भोयर यांनी संस्थेला सर्व फळझाडे विनामुल्य उपलब्ध करुन दिले. कार्यक्रमाला तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे उपाध्यक्ष सतीश अवचट, कोषाध्यक्ष जय मुंगले, श्री तिवारी साहेब, तलाठी संजय भोयर, सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत तोटे, राणी धाकतोड, सायली आदमने, सतीश कोसे, नरेश बावने, शेखर लोखंडे, गोविंद मुंगले, प्लाझा हॉटेलचे संचालक विजय वाघमारे, कृषिमीत्र गजू भोयर, श्याम बोरघरे, अशोक अरगडे याची उपस्थिती होती.