अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर जप्त! शहरातील रेती माफीयावर सिंदी रेल्वे पोलिसांची कारवाई

सिंदी रेल्वे : येथील पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा भोसा शिवारातील वना नदीचे पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच ३१सीबी ६०३० हा भोसा टी पॉइंट येथे तीन ब्रास रेतीची वाहतूक करताना मिळून आल्याने सिंदी रे. पोलिसांनी सदर टिप्पर हा रेतीसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

हा टीपर सिंदी रेल्वे येथील रहिवासी श्रावण रोकडे यांच्या मालकीचा असुन रोकडे यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्यासाठी तहसीलदार समुद्रपूर यांना पत्र देण्यात आल्याचे सिंदी पोलिस कडुन सांगण्यात आले.सदरची कारवाई ठाणेदार वंदना सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदी रेल्वे पोलिसांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here