तांब्याचे तार चोरणारी टोळी जेरबंद! गुन्हे शाखेच्या कारवाईत 5 .62 लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा : शहरातील स्नेहलनगर सेवाग्राम रोडवरील मोटर रिवायडिंगच्या बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील 15 किलो जळलेला तांब्याची चोरी करणा-या तीन आरोना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली असून, त्यांच्याकडून 5 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी वर्धा शहरातील एक तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. चेतन सुकलाल ठाकरे (वय 25) रा. वर्धा, उर्फ कचरा बासेद जुला (वय 27), मोहम्मद मतीन मोहम्मद अशरफ (वय 44) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सदर गुन्हासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने चोरी केलेल्या ताराची विक्री केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरीच्या वापरलेले साहित्य जप्त केले असून, 5 लाख 62 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. इतर तांबे चोरी प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्‍त केली आहे. सदर आरोपोपैकी चेतन ठाकरे याच्यावर खामगाव पोलिसांत दरोड्यांचा गुन्हा नोंद असल्याची माहिती आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, प्रटीप वाघ नितीन ईटकरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here