
समुद्रपूर : रस्त्याच्या कडेला चरत असताना रोहित्राच्या संपर्कात आल्याने दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. ही दुर्दैवी घटना समुद्रपूर तालुकयातील कांढळी येथे 11 जानेवारीला घडली. गावातील रस्त्याच्या कडेला असलेले रोहित्र उघडे आहे. शेजारीच गवत असल्याने जनावरे तिथे चरण्यासाटी येतात. मंगळवारी याच भागात चरण्यासाठी गेलेल्या दोन शेळ्या रोहित्राच्या संपर्कात आल्या. विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी या प्रकाराची तक्रार महावितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे केली आहे. अभियंता नागपुरे चौकशीसाठी येताच नागरिकांनी रोष व्यक्त केला.