दोन आठवडे वादळी पावसाच्या छायेत! हवामान अभ्यासकांनी दिले संकेत

वर्धा : ऋतूबदल आणि पश्‍चिम विक्षोभाच्या सक्रियतेमुळे राज्यभरात वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दोन आठवड्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. गेल्या काही दशकांपासून ऋतुचक्रात आमूलाग्र बदल तर झाला आहेच सोबतच प्रत्येक ऋतूमध्ये हवा, ऊन, पावसाची अनिश्‍चितता सुद्धा वाढली आहे. त्यामुळेच जवळपास महिनाभर उशिरा मॉन्सूनचे आगमन, डिसेंबर अखेरपर्यंत थंडीची दांडी आणि उन्हाळ्यात पावसाची हजेरी, असा बदल विदर्भासह महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here