शेतकऱ्यास जीवे मारण्याची धमकी! प्रवीण व वैभव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवळी : बैलबंडी घेऊन शेतात जात असलेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर उभी असलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली असता दोघांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास कोल्हापूर(राव) येथे घडली.

अभय विनायक बोंदले (२४) रा. कोल्हापूर हा बैलबंडी घेऊन शेतात जात होता. यादरम्यान प्रवीण इंगळे व वैभव इंगळे याची दुचाकी रस्त्यावर उभी असल्याने ती बाजूला घेण्यास सांगितली. या कारणावरून दोघांनीही वाद घालत अभयला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आल्याने प्रवीण व वैभव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here