टाटा एसची उभ्या टकला धडक! 2 गंभीर, 2 बालकांसह 6 जखमी

गिरड : तालुक्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोंडगाव गावाजवळील टाटाएस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळले. या अपघात 2 व्यक्‍ती गंभीर तर 2 बालकांसह अन्य 6 जण किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले तर किरकोळ जखमीवर समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. रविवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास उमरेडकडून टाटाएस क्रमांक एम एच 34 बिजी 6196 हा भरधाव वेगाने जामकडे जात असताना धोंडगाव गावाजवळील दयाशील मुनेश्वर यांच्या घयजवळ चालक इसाक रुस्तमखाँं पठाण (28) रा. वरोरा याचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुसर्‍या कडेला उभ्या असलेल्या ट्रकरवर जाऊन धडकले.

या अपघातात वाहन चालक इसाक रुस्तमखाँ पठाण, अविनाश कुमरे (31) , रुखमा अविनाश कमरे ( 24), जेबा इसाक पठाण (30), शहारुख शगुफ्ता पठाण (21) अयाण इसाक पठाण (8), सोयब सत्तार पठाण (9) सर्व रा. वरोरा, नौशाद सत्तारखो पठाण (34 ) रा. फुटाळा पडोली चंद्रपुर हे. जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी संजय, राहुल मानकर यांनी घटनास्थळी जाऊन सचिन तेलंग, निखिल थुटे, प्रशांत ठाकूर, नितेश बहादूरे, सुरज कुबडे, मुनेश्वर परीवारातील सदस्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथे दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here