वर्धा : भरधाव दुचाकी रस्त्याकडेला उभ्या ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात इंझापूर गावानजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर झाला. याप्रकरणी १६ रोजी सावंगी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. तुषार राजेश्वर शिवलकर रा. भूगाव असे मृतकाचे नाव आहे.
तुषार हा एम.एच.३२ ए.एन. ३७९८ क्रमांकाच्या दुचाकीने भूगाव येथील कंपनीत कामावर जात होता. दरम्यान इंझापूर गावानजीक एम.एच. ४० वाय. २३०० क्रमांकाचा ट्रक रस्त्याकडेला उभा होता, तुषार याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून उभ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात तुषार याचा जागीच मृत्यू झाला. सावंगी पोलिसांनी अपघातस्थळी जात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुण्णालयात पाठविला.