भिवापूर बेड्यातील मोहासडवा नष्ट! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वर्धा : उपविभाग आवीॅ अंतर्गत तळेगाव पोलिस ठाणे हद्दीत भिवापूर पारधी बेडयावर दारूबंदी कायद्यान्वये गावठी दारूभट्टीवर छापा मारला. यावेळी 1 लाख 20 हजार रुपयांचा कच्चा मोहा- सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 17 एप्रिलला करण्यात आली.

आरोपी परवीन चत्र पवार रा. भिवापूर, ता. आष्टी हा पसार झाला आहे. पोलिसांनी छापा मारला असता आरोपी हा भिवापूर शिवारातील शेताच्या धुऱ्याने गावठी मोहा दारुची भट्टी लावून मोहा दारु गाळताना दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा शेतातील तारांच्या कंपाऊंडवरून उडी मारून पळून गेला. मोक्‍यावरून मोहा-सडवा मुद्देमाल मौक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जागीच जप्त करून नाश करण्यात आला. याप्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक नागापुरे, कैलाश सोनवणे, राऊत, संजय बोगा, अखिल इंगळे, अनुप कावळे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here