देवळीतून सात लाखांच्या भंगारासह ट्रक पळविला! औद्योगिक वसाहतीतील घटना

देवळी : औद्योगिक वसाहत परिसरातील महालक्ष्मी टीएमटीसमोर उभा असलेल्या भंगार भरलेला ट्रक चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी दिनेशकुमार किसनलाल टेम्बरे यांनी देवळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही तक्रारीवरून भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री एम.एच. ४० बी.जी. ६७८३ क्रमांकाचा ट्रक महालक्ष्मी टीएमटी समोर उभा होता. लॅन्को कंपनी मांडवा येथून २० टन ३०० किलो वजनाचे भंगार भरून हा ट्रक या ठिकाणी आणण्यात आला होता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास महालक्ष्मी कंपनीसमोर उभा असलेला हा ट्रक वाहन चालक जेवण करण्यासाठी गेल्याचे हेरून चोरट्यांनी चोरून नेला. भंगार भरलेला ट्रक नेहारे नामक व्यक्‍तीने चोरून नेल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here