पाणीपुरीची ऑर्डर दिली, एक लाखांचा लावला चुना! सायबर ठाण्यात गुन्हा केला दाखल

वर्धा : भारतीय सैन्य दलातून बोलत असल्याचे सांगत पाणीपुरी विक्रेत्याची तब्बल ९९ हजार ५०० रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करीत गंडा घातला. ही घटना पेटकर लेआउट मास्टर कॉलनी, सावंगी परिसरात घडली. याप्रकरणी ५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंतामण पुंडलीक खोडे यांचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. भामट्याने त्याला फोन करून मी भारतीय सैन्यातून बोलत असल्याचे सांगून मिलिटरीच्या लोकांसाठी पाणीपुरीची आवश्यकता असल्याचे सांगत पाणीपुरीची ऑर्डर घेतली. त्यानंतर आरोपीने त्याचा क्यूआरकोड पाठवून त्याद्वारे पेमेंट करणार असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा चिंतामणला दुसरा नंबर पाठविण्यास सांगितले असता त्याने मुलीचा नंबर दिला. आरोपीने मुलीच्या मोबाइल क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून चिंतामणच्या मोबाइलच्या डिस्प्लेवर कॅमेरा करण्यास सांगून तसेच पेमेंटसाठी प्रक्रिया करण्यास सांगून एसबीआयच्या बँक खात्यातून क्यूआरकोडद्वारे ९९ हजार ५०० रुफ्यांची ऑनलाइन फसवणूक केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here