जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ब्लॅक स्पाँट’ची पाहणी

वर्धा : जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळे अर्थात ‘ब्लँक स्पाँट’ची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. काही ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक हर्षित परिक, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बूब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शेख समीर शेख याकूब, रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य प्रणव जोशी, महामार्ग प्राधिकरणचे रस्ता सुरक्षा तज्ञ रोहीत माने, निवासी अभियंता श्री.लाखाणी, साईट इंजिनिअर वसंत नाल्हे, संजय उगेमुगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात काही ठिकाणी अपघात प्रवणस्थळे आहेत. या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. वर्धा येथून प्रारंभ केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूरवरुन येतांना वर्धा शहर प्रवेश मार्ग, पवनार, सेलू, खडकी, सेलडोह येथील स्थळांची पाहणी केली. त्यानंतर वर्धा बायपास वरील नागठाणा रोड येथील स्थळाची पाहणी केली. ज्याठिकाणी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, तेथे प्राधिकरणाची मंजुरी घेऊन तातडीने काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. स्थानिक स्तरावरील उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाचे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here