सिरसोली रस्ता अपघातास देत आहे निमंत्रण! ग्रामस्थांची तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी

आष्टी : सिरसोलि (अंतोरा ) गावातील शेतकरी शेतमजूर विध्यार्थी व नागरिक सतत सिरसोलि वरुन खडकी आष्टी तळेगाव मोर्शी कडे ये-जा करत असतात. बाजारपेठ मोर्शी आष्टी नजीक पडत असल्यामुळे सिरसोलि गावकर्याना खडकी चौकातून वाहतूक व वाहन सुरु असतात. परिणामी सिरसोली रस्त्याचे एक वर्षे लोटून रस्त्याची उखडलेल्या खड्याचि दुरूस्ती केली. परंतु दुरुस्ती करून सुद्धा जैसे तेच खड्डे पडत असल्याने अपघात होत आहे.

खडकी ते सिरसोली रस्ता नव्याने पाच वर्षे आधी डांबरिकरन करण्यात आले होते. परंतु ठेकेदारने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खडकी ते सिरसोली रस्त्याचे डांबरिकरन उखळुन गेल्याने मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे सतत अपघात होत आहे. गेल्या मागील काही दिवसापूर्वी वाघाडी नाल्याजवळ एका दामप्त्याचा अपघात झाला आणि दामप्त्यसोबत चिमुकली असून गंभीर जंखमी झाले. गावकर्यानी सामान्य रुग्णालयात दाखल केले .परंतु अशा अनेक नागरिकांचे खड्यामुळे अपघात घडत असल्याने नागरिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करत आहे. खडकी ते सिरसोली रस्त्याचे बांधकाम केलेल्या ठेकेदाराने तात्काळ रस्त्याची पाहणी करून नव्याने रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा बांधकाम विभाग समोर आंदोलन करण्यात येइल असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here