प्रशांत होळकर वर्ध्याचे नविन पोलीस अधिक्षक

वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची नियूक्ती कपण्यात आली आहे.

प्रंशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पदावर कार्यरत आहे. यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती. वाशीम येथे २०१६ पोलीस अधिक्षक म्हणुन कार्यभार सांभाळला.

पुर्व विदर्भात पाच जिल्यांचे तर पश्चिम विदर्भात दोन जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या पदस्थापनेचे आदेश पारीत झाले. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे सह अनेक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पदस्थापनेचे आदेश काढण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here