
वर्धा : शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणी प्रक्रिया, बीजप्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पेरणी करताना योग्य पद्धतीने राबवली जाणारी प्रक्रिया ही भविष्यामध्ये निश्चित चांगले उत्पादन देणारी ठरू शकते. आधुनिक तंत्रज्ञानानुसार टोकण पद्धतीचा वापर करुन कमी बियाणे वापरून पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त उत्पादन शेतीमधून घेता येऊ शकते असे मत तालुका कृषि अधिकारी परमेश्वर घायतीडक यांनी पवनार येथे आयोजित आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकर्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावेळी यूपीएल कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक टिनू बोरसे, पिपरी कृषि महाविद्यालयाचे अधिव्याख्याता वैभव गिरी, कृषि पर्यवेक्षक जामुवंत मडावी, प्रशांत भोयर, कृषिसहायक वैद्य मँडम, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री घायतीडक महणाले की शेतकर्यांनी आपल्या पिकाचा डॉक्टर स्वताच व्हावे, शेतक्यांनी उत्पन्न वाढविण्याकरीता शेतकर्यांनी योग्य औषध, योग्य वेळ, योग्य मात्रा याचा समन्वय साधावा, शेतकर्यांनी निसर्ग साखळी टिकून राहण्यास सहकार्य करावे. पक्षी आपल्या शेतातील पाहुणे आहेत त्यांच्याकरीता शेतात पक्षीथांबे तयार करावेत, मोठ्या प्रमाणात रासायनीक खतांचा वापर करनेही शेतकर्यांनी टाळावे शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रिया, टोकण यंत्राने सोयाबीनची लागवड, रुंद सरी वरंबावर कापूस पिकाची लागवड, निंबोळी अर्क तयार करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला श्रीकांत तोटे, प्रविण तडस, श्री आंबटकर, राजु बावणे, सुरेश ईखार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची उपस्थिती होती.




















































