ट्रॅक्टर-ट्रॉली खाली दबून दोघांचा मृत्यू! जखमीं उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल

देवळी : देवळीवरून अडेगावकडे जाताना अडेगावजवळ ट्रॉली पलटून दोघांचा मृत्‍यू झाला. इतर जखमी झाले. ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. अनिल सुरेश लाकडे व रितीक नीलेश वाघमारे दोन्ही रा. इंदिरानगर अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, देवळीवरून ट्रॅक्टर-ट्रॉली अडेगाव मार्गे सोनेगाव (बाई) येथे वाळू आणण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले. अडेगाव जवळ ट्रॅक्टर उसळल्‍याने ट्रॉलीचा हूक तुटला. यात ट्रॉली ट्रॅक्टर वेगळी होऊन उलटली. त्‍यामध्ये असलेले मजूर ट्रॉलीखाली दबले गेले. जखमींमध्ये ट्रॅकर चालक शंकर मनोहर भानारकर, सागर विजय पारिसे, शिवराम डोंगरे, सचिन नांदूरकर, गजानन भानाकर (रा. इंदिरानगर, देवळी) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आल्‍याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here