पाच महिन्यातील स्थिती! विद्युत मीटरमध्ये छेडछाड; २५७ व्यक्तींना ठोठावला ४९.५५ लाखांचा दंड: दोघांविरुद्ध फोंजदारी गुन्हे

वर्धा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणे हे. कायद्यान्वये गुन्हा असून वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दंडात्मक कारवाई करतात. दंडाची रक्‍कम न भरणाऱ्यांवर अखेर फौजदारी कारवाई केली जात असून मागील पाच महिन्यांत विद्युत चोरी करणाऱ्या दोन व्यक्तींवर महावितरणने फौजदारी कारवाई केली आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या चमूने विशेष मोहीम राबवून मागील पाच महिन्यांत धडक कारवाई करीत वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याची तब्बल २५७ प्रकरणे उजेडात आणले. या २५७ व्यक्तींना ३९ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी २११ व्यक्तींनी ४२ लाख ९२ हजार २3१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूणच महावितरणच्या धडक कामगिरीमुळे विद्युत चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

आकोडा टाकणार्‍या २.३२ लाखांचा झटका

विद्युत वाहिनीवर थेट आकोडा ठाकणार्‍या ४४ व्यक्तींना रंगेहात पकडले आहे. या ४४ व्यक्तींना २.३२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी २१ व्यक्तींनी ७९ हजार १५० रुपयांचा दंड महावितरणकडे भरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here