अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास २४ तासात अटक

कारंजा (घाडगे) : तालुक्याच्या एका खेड्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीस पोलिसांनी २४ तासात नागपुरातून अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दोघेही तेथून पळून जाण्याच्या तयारीत होते. वेळीच पोलीस पोहोचल्याने मुलीसह आरोपीही पोलिसांच्या हाती लगले.

आशिष खरपुरिया (२०) रा. जऊरंवाडा असे आरोपीचे नाव आहे. याने गावातील एका साडेसोळा वर्षीय मुलीला पळवून नेल्याची तक्रार १४ मार्च रोजी कारंजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनेची उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके यांनी दखल घेत तपासचक्र फिरविले. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दोघेही नागपुरात असल्याची माहिती मिळताच पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले.

आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दारासिंग राजपूत, पोलीस कर्मचारी अशोक सोनटक्के, अतुल अडसड, पवन लव्हाळे, पूजा लव्हाळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here