धारदार शस्राचा धाक दाखवत चौघांना लूटले! परिसरात पसरली दहशत

पवनार : कामावरुन घरी परत येणाऱ्या तीघांना आणि सेवाग्राम येथे रुग्णालयात जाणाऱ्या डॉक्टरला सात जणांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवत जबर मारहान करुन रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेत घटनास्थळावरुन पळ काठल्याची घटना वरुड-पवनार रस्त्यावर मंगळवार (ता.१८) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

सचिन मनोहर येरुणकर वय ३० वर्षे, रितेश श्रावण बुरबादे वय २२ वर्षे, गौरव महेन्द्र बोबडे वय २१ वर्षे तिघेही रा. पवनार हे रात्री ९ वाजताच्या सुमारास एमआयडीसी मधुन कामारुन पवनार येथे परत येत असताना वरुड जवळ सात जणांनी हातात धारदार शस्त्र हातत घेवून रस्ता अडवत तीघांनाही बेदम मारहान केली. सचिन येरुणकर याला मांडीवर धारदार शस्त्राने वार करुन जखमी करीत त्याच्याकडे असलेली ७ हजार पाचशे रुपये हिसकावले. गौरव बोबडे यांच्या जवळचा मोबाईल घेत पसार झाले. या घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करुन तपास सूरु केलाल आहे.

ही घटना घडण्यापूर्वी १५ ते २० मिनीटाआधी याच रोडने सेलूवरुन आपल्या दुचाकी वाहनाने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात जाणाऱ्या डॉक्टरला याच टोळीने धारदार शस्त्राचा धाक दाखवून ५ हजार रुपये हिसकावून घेत मारहाण केली. डॉक्टरने आपली दुचाकी तिथेच साडून त्यांच्या तावडीतून सुटत तेथून पळ काढला. वरुड गावात पोहचून आपबीती सांगीतली त्यानंतर गावातील काही तरुन घटनास्थळी आले तोपर्यंत ही टोळी दुसरी घटना करुन घटनास्थळावरुन निघुन गेले होते. मात्र सेलू येथील डॉक्टरने याबाबची तक्रार पोलिसात नोंद केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here