चाकूच्या धाकावर मागितले पैसे

वर्धा : घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत महिलेस पैशाची मागणी करून शिवीगाळ केली. विक्रमशिला नगर परिसरात ही घटना घडली. अनिता तेलंग ही घरी असताना अमन धनवीज हा चाकू घेऊन घरात शिरला. त्याने अनिताला पैसे मागितले. अनिताने पैसे देण्यास नकार दिला आणि ही बाब ईस्तारी धनवीज, याला सांगितली. मात्र, दोघांनी महिलेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here