

वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपआयुक्त तथा सदस्य शरद चव्हाण, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
सदर शिबिर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आचार्य विनोबा भावे, ग्रामिण रुगणालय, सावंगी मेघेचे रक्त संक्रमण अधिकारी सुनिल चावरे व त्यांच्या वैद्यकीय चमूने मोलाचे सहकार्य केले. रक्तदान शिबीराच्या निमित्ताने जिल्हयांतर्गत कार्यरत समाजकार्य महाविद्यालयातील विद्याथी व कर्मचारी तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय वर्धा येथील कर्मचारी अशा एकुण 35 व्यक्तींनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली.