ठाणेदाराविरोधात पोलिस अधीक्षककांडे तक्रार! निलंबनाची मागणी; उपोषणाचा इशारा

मारेगाव : जिल्हा परिषद सदस्य अनिल देवकर यांच्या वर हल्ला करणाऱ्याला पाठिसी घालत असल्याचा आरोप केला आहे. मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांनी गंभीर गुन्ह्यांतील आरोपीकडून चिरीमिरी घेतल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

बोटोणी( चिंचोली) या जिल्हा परिषद मतदार संघाचे विद्यमान सदस्य अनिल देरकर यांच्यावर राहुल सुर या व्यक्तीने ५ नोव्हेबरचे सकाळी 9 वाजताचे सुमारास हल्ला केला यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून नंतर त्यांना चंद्रपुर येथे हलविण्यात आले होते. या घटनेतील आरोपी कडून मालेगाल पोलीस स्टेशनचे राजेश पुरी यांच्या सह बिटजमादार भालचंद्र मांडवकर यांनी गैरअर्जदाराच्या वडीला कडून चिरीमिरी घेतली व आरोपीचा हल्ला करण्याचा उद्देश काय होता याचा तपास न करता प्रकरण दडपले आहे, मी जि.प.सदस्य असताना सुध्दा मला संबंधित पोलिस स्टेशन मधून न्याय मिळाला नाही, अशा अधिकाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या बिट जमादाराचे तात्काळ निलंबन व्हावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

येत्या सात दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास सर्कलचे सर्व माजी, आजी, सरपंच विद्यमान पंचायत समिती सभापती,पदाधिकारी उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनावर वेगाव बोटोणी जिल्हा परिषद मतदार संघाचे विद्यमान सदस्य अनिल देरकर यांच्यासह मारेगाव पंचायत समितीचे सभापती सौ शितल पोटे,जगदिश ठेंगणे,प्रमोद आत्राम, संजिवनी रोगे, चंद्रकांत धोबे, संदिप कारेकार,विमल उरकुडे, संगिता कोवे, माला गौरकार,ज्ञानेश्‍वर किंगरे, प्रदिप बासाडे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here