

वर्धा : शहरातील आर्वी नाका परिसरात असलेल्या गणेशाय ग्राफिक्सला रात्रीच्या सुमारास आग लागली असून, जवळपास ७० हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
बोरगाव (मेघे) येथील पोलीस पाटील गणेश देवढे यांचे आर्वी नाका परिसरात गणेशाय ग्राफिक्सचे दुकान आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱया दिवशी सकाळी दुकान उघडले असता दुकानात आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकानातील संपूर्ण पाहणी केली असता प्रिंटिंग मशीनला डीसी करंट येणाऱ्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने निदर्शनास आले. यात ७० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने बॅनर प्रिटिंग मशीन बचावल्याने मोठे नुकसान टळले.