पुरात वाहून गेलेल्या व्यकतींच्या कुटुंबियांना शासनाची मदत! आ. कुणावार यांचे शुभहस्ते प्रत्येक कुटुंबास मिळाले ४ लाखाचे धनादेश

हिंगणघाट : मागील महिन्यात पुरात वाहून गेलेल्या समुद्रपुर तालुक्यातील दोन मृताकांच्या परिवारास आज महसुल विभागाकड़ून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते धनादेशाद्वारे दोन्ही कुटुंबियांना ४ लाख रक्कमेचे धनादेश सोपविण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार श्री संजय महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

समुद्रपुर तालुक्यात सततधार पावसामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील तास येथील संतोष शंभरकर या वृद्ध इसमाचा मृत्यु झाला, यासह समुद्रपुर येथील रहिवासी असलेल्या श्रीमती रंभाबाई मेश्राम या महिलेचासुद्धा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. आज दि.११ रोजी मृतकांचे परिवारातील सदस्यांना एकूण ४ लाख रूपयांची मदत देण्यात आली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here