


हिंगणघाट : शहरातील शासकीय दवाखाना व गोलबाजार चौकात इलेक्ट्रॉनिक क्वाहून मशीनवर पैसे लावून जुगार खेळ सुरू असताना पोलिसांनी छापेमारी करत एकूण ७ लाख ७७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १४ आरोपींना अटक केली. मात्र, एक आरोपी फरार झाला. ही करवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
आदर्श गवळी (वय २३, संत कबीर वार्ड), विजय प्रेमराज रघाटाटे (४५, संत तुकाडोजी वॉर्ड), किशोर मनोहरराव तेलकोजवार (४६, यशवंतनगर), संजय शांताराम सोनकुसरे (४२, विठ्ठल मंदिर वार्ड, विशाल वंदीशरात माथनकर (5०, शास्त्री वॉर्ड), रूपेश सागर खडतकर (३६, हनुमान वॉर्ड), अर्पित शैलेश मेंढे (२१, भीमनगर वॉर्ड), गौरव प्रभाकर मडावी (१९ ), आशिष शारदाप्रसाद पाराशर (४५, रंगारी वॉर्ड), अनंत नानाजी भीमनवार (५२), शेख नबी शेख सुल्तान (४९, गौतम वॉर्ड), ईमरान खान बिसमिल्ला खान पठाण (४०, निशानपुरा वॉर्ड), राजा शेखर मखरे (3२, स्वीपर कॉलनी), गजानन पांडुरंग कारवटकर (४२, विठ्ठल मंदिर) अशी अटक आरोपींची, तर प्रमोद मुंढे, असे फरार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या कारवाईत आदर्श गवळी, विजय रघाटाटे, किशोर तेलकोजवार, संजय सोनकुसरे व दुकान मालक प्रमोद मुंढे मिळून आले. त्यांच्या ताब्यातील १० इलेक्ट्रॉनिक क्वॉडन मशीन व इतर साहित्य असा २ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गोलबाजार परिसरातील टिनाच्या दुकानातून आशिष पराशर शेख नबी, इरफान खान, राज पखरे, गजानन कारवटकर हे मिळून आले. त्यांच्या ताब्यातील १५ इलेक्ट्रॉनिक क्वॉडून मशीन व इतर असा एकूण २ लाख ९० हजार ३३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सोबतच गोलबाजार येथील एका टिनाच्या दुकानात छापेमारी केली असतांना ९ इलेक्ट्रॉनिक क्वॉडन मशीन व इतर एकूण २ लाख २२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन्ही कारवाईत १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून (9 लाख ७७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, वेदर हिंगणघाट यांच्या नेतृत्वात एपीआय दीपक वानखडे, डीबी पथकाचे प्रमुख पोलिस हबालदार प्रवीण बावणे, अनुप टपाले, गणेश वैद्य, प्रशांत ठोंबरे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.